हिंदी अभिनयसृष्टीत काम करण्याच्या मुद्द्यावर प्रसाद ओकने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला…

मुंबई : मराठी अभिनेता प्रसाद ओक सध्या एक उत्तम दिग्दर्शक म्हणूनही नावारुपास येत आहे. अलिकडच्या काळात त्याचं दिग्दर्शन असेलेल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बराच मोठा गल्ला जमवल्याचं पाहायला मिळालं होतं. काही वर्षांपूर्वी प्रसाद ओकनं ‘दिया और बाती’ मालिकेत एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र त्यानंतर तो फारसा हिंदी अभिनय क्षेत्रात दिसला नाही. नुकत्याच एका मुलाखतीत जेव्हा त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

हिंदी अभिनयसृष्टीत काम करण्याच्या मुद्द्यावर बोलताना प्रसाद ओक म्हणाला, ‘सध्या मी मराठी अभिनय क्षेत्रात काम करत आहे आणि मी या ठिकाणी खूप आनंदी आहे. हिंदी अभिनय क्षेत्रात काम करण्याची माझी सध्या तरी अजिबात इच्छा नाही. जेव्हा मराठी कलाकारांनी हिंदी अभिनय क्षेत्रात कामाची संधी मिळते तेव्हा त्यांच्या आर्थिक फायद्याचा फार कमी विचार केला जातो. त्यांच्यासोबतच्या हिंदी भाषिक कलाकारांना तुलनेत जास्त मानधन मिळतं.’

प्रसाद ओक पुढे म्हणाला, ‘जर मला मराठी अभिनय क्षेत्रात हिंदी अभिनय क्षेत्रापेक्षा जास्त मानधन मिळत असेल तर मग मी हिंदी भाषेत काम का करावं? त्यापेक्षा मी माझ्याच भाषेत काम करेन. खरं तर मला हिंदीमधून फारशा ऑफर आल्या नाहीत. त्यामुळे मी त्याचा कधी फारसा विचारही केला नाही. मी माझ्या भाषेत काम करून खुश आहे. मला माझ्या प्रेक्षकांकडून प्रेम मिळत आहे. त्यामुळे हिंदी मालिकांमध्ये काम करण्यापेक्षा मी मराठीमध्ये एखादी छोटी भूमिका साकारेन.’

Sumitra nalawade: