वाढदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद ओकचं लाडक्या मंजूला दिलं ‘हे’ खास सरप्राईज

मुंबई : (Prasad Oak wife Manjiri Oak Birthday) प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो असं म्हटलं जातं. तसंच काहीस मराठी अभिनेता प्रसाद ओकच्या बाबतीत आहे. बायको जर पाठीशी खंबीरपणे उभी असेल तर नवरा यशस्वी प्रगती करू शकतो. मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी खंबीरपणे उभी आहे. अशीच एक जोडी म्हणजे प्रसाद ओक आणि मंजिरी ओक.

प्रसादच्या आजवरच्या सर्व चढ – उताराच्या काळात मंजिरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आज मंजिरीचा वाढदिवस आहे. त्यामुळे प्रसादने तिच्यासाठी खास पोस्ट केलीय. मंजिरी ओकचा पांढऱ्या गाऊनमधला फोटो प्रसादने शेयर केलाय. या फोटोत प्रसाद ब्लॅक टी शर्ट मध्ये फॉर्मल अंदाजात दिसत आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजू. लव्ह यू अशी पोस्ट लिहून प्रसादने मंजिरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. याशिवाय प्रसादने मंजिरीसाठी खास सरप्राईज प्लॅनचं आयोजन केलं असून दोघे एका हॉटेलमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक सध्या यशाच्या शिखरावर आहे. चंद्रमुखी आणि धर्मवीर या दमदार चित्रपटानंतर त्यांचे अनेक मोठे प्रोजेक्ट जाहीर केले आहेत. डॉ. प्रभाकर पणाशीकर यांचा यांच्या बायोपीक मध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे तर निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तो स्वतः दिग्दर्शित करत आहे. अशातच त्याने एक मोठी घोषणा केली आहे.

Prakash Harale: