मुंबई | Prasad Oak’s Post In Discussion – प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या चांगलाच चर्चेत आहे. तसंच तो सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतो. त्याचबरोबर तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात हास्यवीर म्हणून सहभागी आहे. नुकतीच प्रसादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
प्रसाद ओकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने पार्टी देणार अशा आशयाचा टी-शर्ट परिधान केला आहे. यासोबत त्याने एक छान कॅप्शन दिलं आहे. त्याचं हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
“चंद्रमुखी” आणि “धर्मवीर” दोन्ही चित्रपटांवर पुरस्कारांचा पाऊस पडायला सुरुवात झालीय… So आता “ते सगळे” PARTY साठी मागे लागणारच आहेत. मी आजच देणार होतो पार्टी… पण नेमका श्रावण सुरु झाला. आता पार्टी ठरेपर्यंत हस्तलिखित कडून आलेला हा टी-शर्ट “हास्यजत्रा” टीम ला समर्पित, असं प्रसाद ओकने म्हटलं आहे. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून हास्यजत्रा या सेटवर त्यातील कलाकारांकडून प्रसाद ओकला पार्टी कधी देणार असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र प्रसादने यावर उत्तर दिले नव्हते. मात्र नुकतंच त्याने ही मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.