मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले; प्रसाद कांबळींचा पराभव

मुंबई : (Prashant Damle Elected President Marathi Natya Parishad) अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाच्या वतीने पार पडलेल्या मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये रंगकर्मी पॅनलचा विजय झाला आहे. त्यामध्ये प्रसिद्ध नाटयकर्मी, कलावंत प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. अशी माहिती नाट्यपरिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे.

प्रशांत दामले हे प्रचंड बहुमताने निवडून आले आहेत. त्यांनी नवनाथ कांबळी यांचा पराभव केला आहे. खजिनदारपदी दोडके सतीश यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी गढेकर सुमन यांची निवड झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी याविषयी माहिती दिली आहे. इंदुलकर समीर, पोळके दिलीप, ढगे सुनील यांची निवड कार्यकारिणीवर झाली आहे.

कार्यकारिणीमध्ये तेरा पैकी अकरा सदस्य निवडून आले आहेत. त्यात संजय देसाई, मालपेकर सविता, रेगे दीपक, सुशांत शेलार, शिंगाडे विशाल, विजय साळुंके, चौगुले विजय, महाजन गिरीष, संजय राहते, क्षिरसागर दीपा, पाटील संदीप यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.

सहकार्यवाहपदी तीन पदे होती त्यासाठी सहा उमेवार होते. त्यात इंदूलकर समीर, पोरके दिलीप आणि ढगे सुनील यांच्या नावाचा समावेश आहे. प्रमुख कार्यवाहपदी भुरे अजित गोपीनाथ यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी लोटके सतीश हे प्रचंड बहुमतानं निवडून आले आहेत. उपाध्यक्षपदी (प्रशासन) त्यात गढेकर सुमन यांची निव झाली आहे. यात अविनाश नारकर यांचा पराभव झाला आहे. भाऊसाहेब भोईर यांची उपाध्यक्ष (उपक्रम) यांची बिनविरोध निवडून आले आहेत.

Prakash Harale: