अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी

मुंबई | अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर आज पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. तर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनल पराभूत झाले आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदा प्रशांत दामले विरुद्ध प्रसाद कांबळी यांच्यात थेट लढत होती. त्यातच निवडणुकीत राजकीय हस्तक्षेपही झाल्यानं ती अधिक चुरशी झाली होती. त्यामुळे सर्वांचं लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. या निवडणुकीत मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी 8 जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरीत दोन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले. मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण 1,328 जणांनी मतदान केले. त्यात माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरात 1,245 तर गिरगांव इथं 83 जणांनी मतदान केले. मुंबई उपनगर शाखा (मुलुंड – बोरिवली- वसई) इथे एकूण 730 मतदान झाले होते.

Dnyaneshwar: