पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ आधीच, नगरमध्ये रंगतोय राजकीय कुस्तीचा आखाडा…

Sharad Pawar 5Sharad Pawar 5

अहमदनगर : (Pravin Gite On Sangram Jagtap) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेतील वादावर पडदा पडून या वर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जानेवारीत पुण्यात घेण्याचे निश्चित झाले. मात्र, मधल्या काळात ही स्पर्धा नगरला होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यावरून आता नगरमध्ये राजकीय कुस्ती रंगली आहे. स्पर्धेचे आयोजक राष्ट्रवादीचे आमदार खोटे बोलले, अशी टीका आता होऊ लागली आहे. काँग्रेसच्या पुढाकारातून गेल्या वेळी नगरला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये राजकीय कुस्ती रंगण्याची शक्यता आहे.

कुस्ती अथवा अन्य कोणताही खेळ असो, खेळामध्ये पुढाऱ्यांनी राजकारण करू नये. तालीम संघ हा स्थापनेपासून राज्य परिषद, भारतीय महासंघाशी अधिकृतरित्या संलग्न असून मान्यता प्राप्त आहे. शहरात, जिल्ह्यात स्पर्धांच्या अधिकृत आयोजनासाठी तालीम संघाच्या माध्यमातूनच प्रस्ताव पाठवावा लागतो. मात्र आमदारांनी जाणीवपूर्वक नाव साधर्म्य असणाऱ्या अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर परिषदेची बेकायदेशररित्या स्थापना करून घाणेरडे राजकारण सुरू केला आहे, असे अनेक गंभीर आरोप क्रीडापटू प्रवीण गीते यांनी केले आहेत.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या संकल्पना व पुढाकारातून, अध्यक्ष वैभव लांडगे यांच्या अनुभवी नियोजनातून “भव्य छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित केसरी कुस्ती स्पर्धेचे” तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात, क्रीडा मंत्री सुनील केदार, राज्य परिषदेचे पदाधिकारी, राज्य, जिल्ह्यातील नवे-जुने पैलवान यांच्या उपस्थितीत वाडीया पार्कच्या मैदानावर आयोजन करण्यात आले होते. साडेसोळा लाखांची रोख बक्षीसं दिली होती. हजारो कुस्ती प्रेमींनी आनंद लुटला. त्यामुळे केवळ काळेंवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी आमदारांनी कुस्तीत राजकारण आणले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Prakash Harale:
whatsapp
line