नवी दिल्ली : (Presidential Election 2022 Results) देशात राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झालं होतं. त्यानंतर गुरुवारी 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे युपीएचे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात आहेत.15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.
संसद भवनात एकूण 730 मतदान झालं. या मतमोजणीनंतर विविध राज्यांमधील मतांची मोजणी सुरू होईल. त्यासाठी 10 राज्यांच्या मतपेट्या आलटून पालटून काढल्या जातील. 18 जुलै रोजी भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता. मुर्मू विजयी झाल्या, तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील.
द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असला तरी, निवडणुकांत कधी काय घडेल सांगता येत नाही. कारण शेवटच्या टप्प्यात ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला त्यामुळं हि निवडणुक ‘काॅंटे की टक्कर’ पहायला मिळाली. आज संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येईल तेव्हा पुढील राष्ट्रपती कोण असणार हे समजल.