“आमदारांवर” केंद्रीय तपास यंत्रणांकडून दबाव’, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

मुंबई : (Nana Patole On BJP) सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकिय वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. मात्र, आता मविआ’च्या आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून दबाव टाकला जात आहे. त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडं आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

दरम्यान, विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी भाजपला २२ मतं लागणार आहेत. ती जमवणे त्यांना शक्य नाही. मात्र, भाजपकडून ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. या तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला तरीही आमचा विजय निश्चित आहे. विरोधक कोणाशी बोलताय ते आमच्यापर्यंत पोहोचतंय. त्याचं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, असे गंभीर आरोप पटोले यांनी केले आहेत.

पुढे बाोलताना पटोले म्हणाले, स्विस बँकेत २ वर्षात २०० पेक्षा जास्त टक्के पैसे वाढले आहेत. काँग्रेसला बदनाम केलं. पण आता सत्ता आणि पैसे कोणाकडे आहे ते सगळ्यांना माहिती आहे. भाजपचा काळा चेहरा समोर आला आहे. अग्निपथवरून तरुण सरकारच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहे.  ही भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे, असंही पटोले म्हणाले.

RashtraSanchar: