“हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचीतांपर्यंत पोहोचा” : पंतप्रधान मोदींच पक्षाला आवाहन

नवी दिल्ली : भाजप हा पक्ष घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध करणारा असल्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. ते घराणेशाहीवर कायम टीका देखील करत असतात. आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी पक्षाला हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैद्राबाद मध्ये नुकतीच पार पडली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी पक्षाला मार्गदर्शन केलं. ‘इतर समुदायांमध्ये देखीलं वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण हिंदूंपुरतंच मर्यादित न राहता सर्व वंचित समाजासाठी काम केलं पाहिजे.’ सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या पसमांदा मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्याच आवाहन मोदी यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि रामपूर या दोन मतदार संघातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. त्यात मुस्लीम मतदान देखील मिळालं असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

Dnyaneshwar: