पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली | PM Narendra Modi Mother Health Update – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Hiraben Modi) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना यूएन मेहता रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, हिराबेन मोदी यांना रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात नेण्यात आलं होतं. दरम्यान, 18 जून रोजी त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. यानंतर पीएम मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती.

दरम्यान, 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगरमध्ये मातोश्री हिराबेन यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या, नंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे काही फोटो समोर आले होते.

Sumitra nalawade: