Manoj Jarange Patil: “…तर पंतप्रधानांचं विमान शिर्डीत उतरूच दिलं नसतं”, मनोज जरांगेंनी स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Patil | राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय घेण्यासाठी महिन्याभराची मुदत मागितली होती. पण ही मुदत 24 ऑक्टोबरला संपल्यानंतरही सरकारनं निर्णय घेतला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. अशातच काल (26 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे शिर्डी (Shirdi) दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदींनी सभेत भाषण करताना मराठा आरक्षणाचा उल्लेख केला नाही. तर आता याबाबत मनोज जरांगे पाटलांनी रोखठोक अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परवा दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांना मराठा आरक्षणाबाबत सांगितलं असेल असं वाटलं होतं. पण त्या दोघांनी पंतप्रधानांना आरक्षणाबाबत सांगितलं नसल्याची शंका वाटत आहे. तसंच जर त्यांनी सांगितलं असेल तर मग पंतप्रधान मोदी त्यावर जाणूनबुजून बोलले नसतील का? असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.

पंतप्रधान मराठा आरक्षणाबाबत काही बोलले किंवा नाही बोलले तरी याचा मराठ्यांना काही फरक पडत नाही. मराठा समाज काल यासाठी शांत होती की पंतप्रधान हा विषय हाताळतील, असं वाटलं होतं. तसंच ते मुख्यमंत्र्यांना हा विषय मार्गी लावण्यास सांगतील, असंही वाटलं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले.

पंतप्रधानांच्या बाबतीत मराठा समाजाच्या मनात वैरभावना नव्हती. जर वैरभावना असती तर पंतप्रधानांचं विमान शिर्डीत खाली उतरूच दिलं नसतं. ते वरचेवर परत पाठवलं असतं, असंही जरांगेंनी सांगितलं.

Sumitra nalawade: