Prithvi Shaw Viral Video : भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाणामारी स्पष्टपणे दिसून येत आहे.
पृथ्वी शॉ आणि त्या तरुणी मध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी या प्रकरणानंतर पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाल्याची चर्चा आहे. पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर दोन जणांनी हल्ला केला होता.
व्हिडिओ बनवताना पाहून पृथ्वी शॉने कॅमेराला धक्का दिला. याशिवाय समोर आलेल्या इतर व्हिडिओंमध्येही पोलिस घटनास्थळी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वी शॉ रस्त्यावर फोन हलवताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या प्रकरणातील मुलीच्या वकीलांनी पृथ्वीवर आरोप केला आहे की त्यांने या मुलीला दांडक्यानं मारले आहे.
हा सगळा गदारोळ एका सेल्फीवरून झाल्याच्या बातम्याही याआधी येत होत्या. मुंबईत दोन जणांना पृथ्वीसोबत सेल्फी घ्यायचा होता, पृथ्वीने या चाहत्यांना पहिल्यांदा सेल्फी दिला पण पुन्हा सेल्फी घेण्यास सांगितल्यावर पृथ्वीला मारहाण झाली.