नऱ्हे-आंबेगाव नजीक मालवाहू ट्रक व खाजगी बसचा अपघात; चार जणांचा मृत्यू, पाहा व्हिडीओ

पुणे : काल मध्यराञी ०२•१७ वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात पुणे बंगलोर हायवे, नऱ्हे-आंबेगाव, स्वामी नारायण मंदिराच्या उतारावर एक मोठा मालवाहतुक करणारा ट्रक व खाजगी बस यांचा अपघात झाला झाल्याचीमाहिती मिळाली. अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची ०४ अग्निशमन वाहने व ०१ रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून ०१ रेस्क्यु व्हॅन अशी एकुण ०७ अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १० पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत.

खाजगी बस एमएच ०३ सीपी ४४०९ निता ट्रॅव्हल्स कंपनीची असून कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. मालवाहतुक करणारा मोठा ट्रक एमएच १० सीआर १२२४ यामधे मोठ्या प्रमाणात साखरीची पोती असल्याचे समजले.

Dnyaneshwar: