मुंबई : (Priya Berde joined BJP) सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितित प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शनिवार ११ फेब्रुवारी २०२३ ला पक्षीय कार्यकारणी बैठक झाली. यावेळी अनेक नवीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी प्रिया बेर्डे यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप मधला प्रवेश स्वीकारला.
दरम्यान प्रिया बेर्डेंनी ७ जुलै २०२२ ला राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रावादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलेला. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र म्हणत प्रिया बेर्डे यांनी भाजप मध्ये प्रवेश केलाय