मुंबई | बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) जगभरात लाखो चाहते आहेत. पण प्रसिद्धी म्हटलं की त्याबरोबर वाद हे आलेच! पुन्हा एकदा प्रियांका वादात सापडली आहे. प्रियांकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती भारतीय सिनेसृष्टीबद्दल बोलताना दिसत आहे. पण वादग्रस्त वक्तव्याने सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे.
भारतीय सिनेसृष्टीबद्दल प्रियांका चोप्रा काय म्हणाली ?
प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 2016 मधला एमी पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे. एक पत्रकार प्रियांकाला भारतीय सिनेसृष्टीबद्दल प्रश्न विचारत आहे. तसेच अभिनेत्रीला नृत्याची झलक दाखवण्यास सांगत आहे. त्यावर प्रियांका म्हणते,”भारतीय सिनेमांत फक्त हिप्स आणि बूब्सवर फोकस करण्यात येतं”. त्यानंतर प्रियांका नृत्याची झलक दाखवते. त्यामुळे प्रियांका चोप्रा सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे.