परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यासाठी प्रियांकाची खास तयारी; शेअर केला ‘तो’ फोटो

नवी दिल्ली | Parineeti Chopra-Raghav Chadha – अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा (Engagement) लवकरच पार पडणार आहे. हा सोहळा काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. यामध्ये राजकीय नेत्यांसह अनेक बाॅलिवूड कलाकारांचा समावेश असणार आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीत पार पडणार आहे.

परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) दिल्लीत पोहोचली आहे. तसंच या साखरपुड्यासाठी तिनं खास तयारी केली आहे. याबाबतचा एक फोटो प्रियांकानं शेअर केला आहे. तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून तिची साखरपुड्यासाठी तयारी झाल्याचं दिसतंय.

प्रियांका आता कपूरथ हाऊसलाही पोहोचली आहे. प्रियांकासोबतच फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही साखरपुड्याला पोहोचला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच आता चाहते परिणीती आणि राघव यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

Sumitra nalawade: