दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे | राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सविस्तर वेळापत्रक http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. वेळापत्रकाबाबत काही हरकती-सूचना असल्यास त्या १५ दिवसांत विभागीय मंडळ, राज्य मंडळाकडे लेखी स्वरूपात सादर करता येतील.

पुरवणी परीक्षेचा निकाल

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा निकाल २९.८६ टक्के लागला आहे, तर बारावीचा ३२.१३ टक्के लागला. दहावीच्या निकालात ५१,४७ टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

admin: