इंदापूर : इंदापूर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी स्वयंसेवक प्रा. रणजित मोहन मोरे यांनी मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे या संशोधन केंद्रातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत प्राचार्य प्रा. डॉ. जीवन सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र या विषयात पीएचडी मिळविली आहे. प्राणीशास्त्र विषयात, नुट्रेशनल प्रोफालिंग अँड मोलेकुलार फायलोजेनेटिकस्य ऑफ हायपोरॅमफस लिंब्याटस अँड झेनेंटोडॉन कॅसिला ऑफ उजनी रिझरवायर, महाराष्ट्र (इंडिया) हा विषय प्रबंध सादर करून पीएचडी मिळविली आहे.
यासाठी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरचे प्राचार्य प्रा. डॉ. जीवन सरवदे यांनी मार्गदर्शन केले. यासाठी पुणे भारतीय प्राणी सर्वेक्षणचे वैज्ञानिक डॉ. के.पी. दिनेश, मॉडर्न कॉलेज गणेशखिंड प्राचार्य डॉ. संजय खरात, पुणे विद्यापीठाचे कौशल्य विकास मंडळचे संचालक डॉ. राधाकृष्ण पंडित यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले.