पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधले आणि या विषयाला वाचा मिळाली. हडपसर ल्वे स्थानकाचा विकास होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. शहराबरोबर उपनगर झपाट्याने विकसित होत आहे. पुणे महानगरपालिका देशातील सर्वाधिक मोठी महानगरपालिका म्हणून मानली जात आहे. त्यामुळे उपनगर आणि परिसराच्या दळणवळण यंत्रणेसाठी आता ल्वेसेवा नागरिकांना अत्यंत गरजेची वाटू लागली आहे. पुणे स्टेशन ल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेऊन, हडपसर ल्वे स्थानकाचे काम दोन वर्षांपासून सुरू झाले तरी ते निधीविना अपु असल्याचे दिसून येत आहे. येत्या दीड वर्षात ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा बापट यांनी केलेल्या मागणीमुळे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षात प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरून नवीन गाड्या धावणे शक्य होत नाही. त्यामुळे पुणे स्टेशनऐवजी हडपसरसारख्या पर्यायी स्टेशनवरून गाड्या सुरू करणे आवश्यक आहे. याकरिता हडपसर ल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. पुणे जंक्शनवरून सुमारे १५० लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. यापैकी काही गाड्या हडपसर येथून सोडल्यास पुणे जंक्शनवरील भार कमी होईल. पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे काही गाड्या हडपसरला हलवत आहे. सध्या हडपसर ते हैदराबाद ही विशेष ट्रेन हडपसर रेल्वे स्थानकावरून धावते. परंतु हडपसर रेल्वे स्थानकावर चार फलाट असून, प्रवाशांसाठी एक फूट ओव्हरब्रीज आहे. स्थानकावर थांबणार्या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे स्थानकात सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्याकरिता वैयक्तिक किंवा खासगी प्रवासी वाहनाचा वापर करावा लागत असल्याने त्यांचेवर आर्थिक भार पडतो.
त्याचप्रमाणे स्थानकावर प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची जागा कमी असल्याने जागा उपलब्ध करून वाहनतळ विकसित करावे, मुख्य रस्त्यापासून स्थानकाकडे जाणारे रस्ते हे अरुंद असल्याने वाहतूककोंडी नित्याची बाब झाली असल्याने स्थानकाकडे जाणार्या रस्त्याचे रुंदीकरण करावे, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने येथे प्रशस्त स्थानक इमारत व आरक्षण केंद्र इमारत उभारावे, सध्या स्थानकावर प्रवाशांकरिता पत्र्याच्या शेडमध्ये प्रतीक्षालय करण्यात आले आहे, ते सुसज्ज इमारतीत करावे. ज्येष्ठ नागरिकांना साहित्य घेऊन जिना चढणे शक्य नसल्याने स्वतंत्र व्यवस्था करावी, या व इतर अनेक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. म्हणून हडपसर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केल्याचे बापट यांनी सांगितले.
हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी लोकसभेत कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधले. ल्वे स्थानकावरील वाढता ताण लक्षात घेता हडपसर येथे टर्मिनल सुरू केले; पण अद्याप म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. निधीअभावी हडपसर ल्वे स्थानकावर अद्याप मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे हे निश्चित आहे.