अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने प्रदर्शित होण्याआधीच केली बक्कळ कमाई

Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या आगामी पुष्पा 2 (Pushpa 2) सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुननं पोस्टर शेअर केले. या पोस्टरमध्ये अल्लूचा खतरनाक लुकमध्ये दिसला आहे. पुष्पा 2 मधील अल्लू अर्जुनचा जो लुक आहे त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा देखील झाली. त्याबरोबरच सिनेमाचं पोस्टरही खूप व्हायरल झाले होते. पुष्पा द रुल म्हणजेच पुष्पा 2 हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे.

‘पुष्पा 2’ च्या ऑडिओ राइट्सची किंमत

माहितीनुसार, दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी विकले गेले आहेत. ‘पुष्पा 2’ चे ऑडिओ राइट्स 65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. एका रिपोर्टनुसार, साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ आणि ‘R R R’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ऑडिओ राइट्स सुमारे 10 कोटी ते 25 कोटींमध्ये विकले गेले होते. त्यामुळे आता ‘बाहुबली 2’ आणि ‘R R R’ या चित्रपटांचे ऑडिओ राइट्स प्राइजचे रेकॉर्ड पुष्पा-2 या चित्रपटानं तोडलं आहे.

Dnyaneshwar: