साडेनऊ हजार कोटींच्या अर्थसंकल्पीय आराड्यामुळे पुणेकरांना दिलासा

Pune budget 2023 : पुणे महापालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी यंदाही अर्थसंकल्प फुगविण्याचा आपला ‘विक्रम’ कायम ठेवला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मिळकर आणि पाणीपट्टी दरांमध्ये कुठलीच वाढ करण्यात आली नाही, त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी आठ हजार 592 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा स्थायी समितीला सादर करणाऱ्या आयुक्तांनी यंदा त्यामध्ये 923 कोटी रुपयांची वाढ करत नऊ हजार 515 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा शुक्रवारी स्थायी समितीला सादर करून त्याला मान्यता दिली आहे.

पुण्याच्या अर्थसंकल्पातील मुद्दे

  • पुण्यातील रस्त्यासाठी ९९२ कोटी रुपयांची तरतूद
  • पी एम पी एल साठी ४५९ कोटी रुपयांची तरतूद
  • पुणे शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी ४६८ कोटी रुपये
  • आरोग्यासाठी ५०५ कोटी रुपयांची तरतूद
  • नियमित मिळकत कर भरणाऱ्याना पुणे महानगर पालिका बक्षीस जाहीर करणार, यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात ८ नवीन उड्डाणपूल उभारणार
  • नव्याने समाविष्ट 23 गावांसाठी विशेष तरतूद
  • पगार आणि पेन्शनवर सुमारे ३१०० कोटी खर्च होणार
  • पुण्यात होणारे काही महत्त्वाचे प्रकल्प:
  • पुण्यात कचऱ्यापासून हायड्रोजन प्रकल्प उभारणार
  • वारजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
  • सिंहगड रोड उड्डाणपूल, नदी पुनर्जीवन प्रकल्प होणार
  • डॉग पार्क, हायड्रो ऊर्जा प्रकल्प, चार्जिंग स्टेशन उभारणे आदींचा समावेश
  • श्वान प्रेमींसाठी पुण्यात डॉग पार्क उभारण्यात येणार
Dnyaneshwar: