पुणे | पुण्यातील हडपसर ( Pune ) परिसरात हा प्रकार घडला आहे. सोसायटीत येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून दोन शेजारी एकमेकांना भिडलेत. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आधीक तपास सुरु आहे.
ही घटना फुरसुंगीतील पार्क उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली. या सोसायटीत राहणाऱ्या दिव्या राहुल तिवारी यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तर याच सोसायटीत राहणारे त्यांचे शेजारी अंकित पाठक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दिव्या तिवारी या सोसायटीतील भटक्या कुत्र्यांना जेवण खाऊ घालत असल्याने अंकित पाठक व त्यांची पत्नी यांचे दिव्या तिवारी यांच्या सोबत भांडण झाले. या भांडणाचा व्हिडीओ दिव्या तिवारी फोन मध्ये रेकॉर्ड करत असताना अंकित पथक यांनी त्यांचा मोबाइल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता, इतकेच नाही तर फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.