Pune Crime : मोफत सूप विकणे पडले महागात; हॉटेल चालकावर धारदार शस्त्राने हल्ला

पुणे | संस्कृतिक शहर पुण्यात गुन्हेगारीचे (Pune Crime News) प्रमाण अधिक वाढत चालले आहे. आधीच कोयता गँगची दहशत आणि आता त्याच प्रकारची गुन्हेगारी वाढत आहे. याच पुणे शहरातून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवीन व्यवसायात जम बसवण्यासाठी सुरु केलेली योजनाच जिवावर बेतली आहे. या योजनेमुळे रागवलेल्या समव्यवसायिकांनी एकावर सशस्त्र हल्ला केला. यात तो व्यक्ती जखमी झाला. या प्रकरणी पोलिसींनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरातील खडकी परिसरात ही घटना घडली.

खडकीत रामकृपाल पाल यांनी चौपटीवर हॉटेल सुरु केले. या हॉटेलमध्ये ग्राहकांची दरवळ सुरु करण्यासाठी त्यांनी योजना सुरु केली. हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास ते सूप मोफत देऊ लागले. या योजनेमुळे त्यांचा व्यवसाय वाढला. परंतु त्यामुळे प्रतिस्पर्धींचा व्यवसाय मंदावला.

आरोपी सिद्धार्थ भालेराव व दिग्विजय गजारे यांनी रामकृपाल यांना ही योजना बंद करण्याचे सांगितले. कारण या योजनेमुळे त्यांचा व्यवसायावर परिणाम होत आहे. परंतु रामकृपाल यांनी ऐकले नाही आणि त्यांनी फ्री सूप देण्याची योजना सुरुच ठेवली. यामुळे रामकृपाल यांचांशी सिद्धार्थ भालेराव व दिग्विजय गजारे यांनी वाद घातला. त्यानंतर त्यांच्यांत हाणामारी झाली. रामकृपाल यांच्यांवर चाकूचे वार करण्यात आले. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी सिद्धार्थ व दिग्विजय फरार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांची वरिष्ठ निरीक्षक विष्णू तम्हाने यांनी तपास सुरु केला आहे.

Dnyaneshwar: