पुणे : (Pune Crime News) दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमन अलीम शेख (वय २५, रा. नवाजिश पार्क, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शेखने शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्या होत्या. तो दुचाकी विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून शेखला पकडले. चौकशीत त्याने पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक दिनेश पाटील, अमोल हिरवे, राहुल वंजारी, सुहास मोरे, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी आदींनी ही कारवाई केली.