पुणे | सांस्कृतिक शहर पुण्यात (Pune) दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुण्यातील महाळुंगे भागातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून कंपनी मालकाने एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. बलात्कार करून नंतर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही तिला देण्यात आली आहे.
दरम्यान पिडीतेकडून पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला असता, कंपनीच्या मालकाच्या मित्राने तिचा खून करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना पुण्यातील खेड तालुक्याच्या महाळुंगे हद्दीत घडली आहे. कंपनीचा मालक विजयकुमार जनार्दन पोतदार (वय 55) साथीदार मिथुन गेंदकुमार दास (वय 28) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
फिर्यादीने तुझी पोलीस स्टेशनला तक्रार करणार असल्याचे विजयकुमारला सांगितले. त्यावर विजयकुमारने त्याचा मित्र मिथुनला फिर्यादीचा मोबाईल नंबर दिला. मिथुनने फिर्यादीस फोन करून ‘विजयकुमारबरोबर काय केले आहे, मला माहीत आहे. तू जर त्याच्याविषयी कोणाला काही सांगितले. तर, तुझा खून करीन,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे तपास करीत आहेत.