पुणे : BREAKING NEWS : (Mukta Tilak Passes away) पुणे (Pune) शहराच्या माजी महापौर (Pune ex mayor Mukta Tilak Passes away) राहिलेल्या मुक्ता टिळक यांचे आज दुपारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले आहे. (Mukta Tilak Passes away by Cancer) त्या सध्या भाजपच्या आमदार (BJP MLA Mukta Tilak Passes away) असून मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाचा रोगाशी झुंज देत होत्या. आज दुपारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५७ वर्षांच्या होत्या.
पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता शैलेश टिळक २०१९ च्या राज्य निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून कसबा पेठेतून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. २०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या.