पतीच्या डोळ्यादेखत बिबट्याने तिला ऊसात फरफटत नेले.., पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे | शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बुधवारी रस्त्याने जाणाऱ्या पूजा जाधव या 22 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिला जवळच्या उसाच्या शेतात फरफटत नेले. तिच्या गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने या महिला जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा बिबट्याच्या दहशतीचे वातवरण पसरले आहे.

सदर महिला ही पुणे जिल्ह्यातील टाकेवाडी, कळंब (ता. आंबेगाव) येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव (वय २६) व दिर विश्वास बाळू जाधव (वय ३८) असे तिघे मोटारसायकलवर जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी महिलेचा पती व दिराच्या डोळ्यादेखत महिलेवर बिबट्याने हल्ला करीत उसाच्या शेतात ओढत नेले. त्यानंतर दोघांनी आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना जमा केले. नागरिकांनी शोध घेतला असता उसाच्या शेतात पूजाचा मृतदेह आढळून आला.

Dnyaneshwar: