पुणे : (Pune Lok Sabha Bypoll Election BJP discussion) दोन आठवड्यापूर्वी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्या. रिक्त झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तीन जणाच्या नावांची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची नावे समोर येत आहेत. या तीन नावांपैकीच एकाला तिकीट मिळणार का? की आणखी कोणते नाव समोर येणार हे पाहाव लागणार आहे.
तर महाविकास आघाडीकडून कसब्याचे नवनिर्वाचीत काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परंतू ‘मविआ’कडून अद्याप अशी कोणतीही माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी पुणे शहराध्यक्ष सचिन मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भावी खासदार असा उल्लेख करणारे बॅनर पुण्यात झळकले होते. त्यांच्या या अती उताविळपणाचा फकटा त्यांना बसण्याची शक्यता आहे.