तात्यांनंतर आता आण्णांची पोस्ट व्हायरल; मोहोळ यांना नेमकं सुचवायचंय काय ?

Blue Guest Featured Live Event Twitter Post 23Blue Guest Featured Live Event Twitter Post 23

पुणे | ‘जलने वालों को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग में आ रहै है’, अशा आशयाचा व्हिडीओ मुरलीधर मोहोळांनी (Murlidhar Mohol) इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यातून त्यांनी त्यांच्या विरोधकांना इशारा दिला आहे. भाजपची संभाव्य यादी जाहीर होताच मुरलीधर मोहोळांच्या विरोधात भाजपनेच बॅनरबाजी केली होती. स्टॅंडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं. आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पडणार, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी या बॅनरवर बोलताना रात गई बात गई, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र सोशल मीडियावरुन ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है, असा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी भाजपलाच इशारा दिलाय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्यात सध्या लोकसभेच्या (Loksabha Election 2024) निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अनेक बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच पुणे आणि बारामतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडे इच्छूकांची मोठी रांग आहे.त्यातच पुण्यातील भाजपच्या इच्छूकांनी सोशल मीडियावर आपला प्रचार करायला सुरुवात केली आहे. भाजपने लोकसभेची संभाव्य यादी जाहीर केली. त्यात पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव आहे. त्यांनीदेखील सोशल मीडियावरुन आपल्या कामाचा आढावा शेअर करायला सुरुवात केली आहे.

मोहोळ की मुळीक ?

दरम्यान,भाजप नेत्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यानंतर जगदीश मुळीक यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र, या भाजपच्या संभाव्य यादीत मुरलीधर मोहोळ यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळांची नियुक्ती करण्यात आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ते सक्रियपणे होते. या निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी मतदारसंघाचे दौरे केले. केंद्रीय मंत्री अमित शाहांनी सुद्धा देखील मतदारसंघाचा दौरा केला होता. आता पुण्य़ात मोहोळ कि मुळीक नेमकं कोणाला उमेदवारी मिळते, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line