आई गं! आईनेच पोटच्या 4 वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून केला खून

rashtrasanchar news 2023 03 28T183442.773rashtrasanchar news 2023 03 28T183442.773

पुणे | पुणे शहरातील हडपसर परिसरात आईनेच पोटच्या चार वर्षीय मुलीचा चाकूने भोसकून खून केला आहे. वैष्णवी महेश वाडेर ( वय 4 ) असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पना वाडेर हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी ( 27 मार्च) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हडपसर येथील सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. मुलीचा खून कोणत्या कारणातून केला, हे मात्र अद्याप समजू शकलं नाही. आरोपी कल्पना ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती.

23 दिवसांपूर्वी संबंधित कुटुंबीय तिथे राहण्यास आले होते. महिला बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय करत होती. कल्पना सोमवारी भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तिथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. शेजारच्यांनी तिला दरवाजा उघडण्यास सांगितलं. घरमालक आणि शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिलं असता मुलीचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. यावर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यात घेतलं आहे. या हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

Dnyaneshwar:
whatsapp
line