पुण्यातून दुसरी धक्कादायक घटना; प्रेमसंबंधास नकार दिल्याने विवाहितेने बॉयफ्रेंडला केल किडनॅप

पुणे | विद्येच्या माहेरघरात हे चाललंय काय असा प्रश्न आता सर्वांना पडू लागलाय. आजच्या दिवसातील एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडलेली दुसरी घटना समोर आली आहे. विवाहित तरुणीने प्रियकर तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून तरुणाचे अपहरण करून त्याला गुजरातमधील वापी येथे नेण्यात आले होते. उत्तमनगर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून वापी येथे जाऊन तरुणाची सुटका केली. प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी तरुणीने दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील एका तरुणाचे गुजरातमधील वापी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या एका 28 वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचा विवाह करण्याचे निश्चित केल्याने तो पुण्यात परत आला होता. तरुणाने प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या विवाहित तरुणीने तरुणाचे अपहरण करण्याचा कट रचला. इतकेच नाही तर तरुणाचे अपहरण करुन थेट वापीला नेऊन डांबून ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती.

आरोपी तरुणीने प्रियकर तरुणाच्या अपहरणासाठी दोघांना सुपारी दिली होती. या प्रकरणी तरुणीसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय 21, रा. बच्छाव वस्ती, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) आणि अक्षय मारुती कोळी (वय 26, रा. पुसेगाव, गोरे वस्ती, ता. खटाव, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तरुणाच्या भावाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रेमप्रकरणातून तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. विवाहित तरुणीने दोन साथीदारांच्या मदतीने तरुणाला वापी येथे नेले होते. तपास पथकाने तातडीने तपास करून तरुणाची वेळीच सुखरूप सुटका केली.

Dnyaneshwar: