गुन्हेगारीवर पुणे पोलिसांची लगाम… आक्रमक होऊन केले ‘हे’ ऑपरेशन

पुणे :

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढल्यामुळे पोलीस आता आक्रमक झाले आहे. कोयता गँगचा धुमाकूळ रोखण्यासाठी गुन्हेगारांवर मोका लावण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ॲक्सन मोडमध्ये आले असून आतापर्यंत सरासरी पोलिसांनी दीड हजारापेक्षा जास्त गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार स्वत: रस्त्यावर उतरले. पुणे शहर पोलिसांकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले आहे. त्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर पुण्यात कारवाई करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये 115 जणांना अटक केली आहे. तसेच 1824 गुन्हेगारांची तपासणी करून त्यापैकी 577 गुन्हेगार असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावर विविध कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सलग तिसऱ्यांदा कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले.

सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस चौकीजवळ काही दिवसांपूर्वी तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला होता. त्यावेळी पोलीस चौकीत एकही पोलीस नव्हता. यामुळे आयुक्त रितेश कुमार यांनी काही जणांवर निलंबनाची कारवाई केली. तसेच आता प्रत्येक पोलीस चौकीवर २४ तास पोलीस असणार असून आता प्रत्येक पोलीस चौकीवर २४ तास पोलीस असणार आहे. पुणे शहरात १११ पोलीस चौकी आहेत. त्या २ शिफ्टमध्ये २४ तास सुरू राहणार असल्याचे रितेश कुमार यांनी सांगितले.

admin: