मोठी बातमी! कोयता गँगला बेड्या ठोकण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

पुणे : गेल्या काही महिन्यापासून पुणे शहरात कोयता गँगने (Koyata Gang) धुमाकूळ घातला आहे. अनेक घटना घडल्यानंतर पुणे पोलिस (Pune Police) अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणाची पुणे पोलीस आयुक्तांनी (Pune Police Commissioner) गंभीर दखल घेतली आहे. अशा घटना घडू नये यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ (rajnish seth dgp) यांनी दिली आहे. पुण्यातील एसआरपीएफ ग्रुप रामटेकडी (SRPF group Ramtekadi) येथे ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ (Maharashtra state police games) या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. (pune police set a Special Squad held to take strict action against koyata gang)

दरम्यान, पुणे पोलिसांकडून या स्कॉडची स्थापना करण्यात आली असून याद्वारे पुणे शहरात आणि परिसरात दहशत माजविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोयता गँगची दखल पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. या गुन्ह्यांना पायबंद कशा प्रकारे घालता येईल, याबाबत उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. लवकरच कोयता गँगला पायबंद घातला जाईल, असा विश्वास पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी यावेळी व्यक्त केला.

Dnyaneshwar: