“पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”

पुणे | ब्राह्मण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवितास धोका असल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. उदयपूरप्रमाणे काही पुण्यात घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी आनंद दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असं ट्विट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांचे समर्थन करणाऱ्या उदयपूर येथील कन्हैयालाल आणि अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे देशासह राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, आता ब्राह्मण महासंघाचे नेते, कडवट हिंदुत्ववादी कार्यकर्ते आनंद दवे यांच्या जीवितास धोका असल्याचं केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून, केंद्राच्या या सूचनेनंतर पोलिसांनी दवे यांचे कार्यालय, घर आणि हिंदू महासंघ कार्यालयास सशस्त्र पोलिसांनी संरक्षण दिले आहे.

Sumitra nalawade: