राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात वाहतूककोंडी झाल्यानंतर पहिल्यांदा वाहतूक पोलिसांना लक्ष्य केले जाते. मात्र ही कोंडी केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच नव्हे, तर खड्डे, खराब रस्त्यामुळेही होते, याचा विसर पडतो. मात्र याच मुख्य कारणाकडे लक्ष वेधून शहरातील ७५ ठिकाणचे खराब रस्ते व खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले अाहे. यावरून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांचा ‘आटापिटा’ सुरू असल्याचे दिसून आले आहे.
रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आणखी काही प्रमाणात मदत होण्याची शक्यता आहे. मागील एक ते दोन महिन्यांपासून शहरात वाहतूककोंडीची समस्या आहे. परिणामी वाहतूक पोलिसांचा रस्त्यावरील अभाव आणि वाहतूक नियमन करण्याऐवजी दंडात्मक कारवाई करण्याकडे दिला जाणारा भर यामुळे वाहतूक पोलिसांना नागरिकांसह विविध विभागांकडून टीकेचे धनी केले जाते.
शहरातील काही ठिकाणचे बहुतांश रस्ते खराब आहेत, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. याचा थेट परिणाम वाहनचालकांवर होत आहे. त्यामुळे खराब रस्ते व खड्डे दुरुस्त करण्यात यावेत, याबाबत पोलिस आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये ७५ ठिकाणांचा समावेश आहे. येत्या काळात खराब खड्डे बुजविल्यास काही प्रमाणात का होईना वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल.
_ अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे असताना, तेथे सुधारणा करण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात शहराच्या विविध भागातील खराब रस्ते व खड्डे असलेल्या ७५ ठिकाणांची नावे देण्यात आली. तर, संबंधित रस्ते तातडीने दुरुस्त केले जावे, रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूककोंडी कमी होण्यासह गंभीर स्वरूपाचे अपघातही कमी होतील, असे नमूद केले आहे.
खराब रस्ते व खड्डे पडलेले रस्ते….
- कोथरूड विभाग- वेदभवन चौक ते कोथरूड डेपो चौक- नळस्टॉप चौक ते पौड फाटा चौक- आठवले चौक ते नळ स्टॉप चौक
- डेक्कन विभाग- गरवारे पूल ते खंडूजीबाबा चौक- स्वातंत्र्य चौक ते रसशाळा- लकडीपुल
- चतु:शृंगी विभाग- बालेवाडी चौक ते पॅन कार्ड- राजवाडा हॉटेल ते बाणेर फाटा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक ते एस.बी.जंक्शन
- शिवाजीनगर- सुभाषचंद्र बोस चौक ( संचेती रुग्णालय) ते शिवाजीनगर- वीर चाफेकर चौक ते शिवाजीनगरखडकी- किर्लोस्कर कंपनी ते गुरुद्वारा- पाचवड चौक ते आरगडे कॉर्नर- सीएफडी डेपो ते फॅक्टरी हॉस्पिटल
- येरवडा- गुंजन चौक ते गोल्फ क्लब चौक- पूर्णकुटी चौक ते गुंजन चौक- सादलबाबा चौक
- बंडगार्डन विभाग- आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक-शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का स्टेशन- बोलाई चौक ते साधू वासवानी चौक- पुणे स्टेशन ते अलंकार चौक- आयबी चौक ते सर्किट हाऊस चौक
- भारती विद्यापीठ विभाग :- कात्रज चौक ते जुना बोगदा- कात्रज चौक ते नवले पुल- कात्रज चौक ते गोकुळ नगर बस्थांबा (कात्रज कोंढवा रस्ता)- पद्मावती चौक
- सहकार नगर विभाग- महेश सोसायटी चौक ते पासलकर चौक- स्वामी विवेकानंद रस्ता
- स्वारगेट- जेधे चौक ते गोळीबार मैदान चौक- सेवन लव्हज चौक ते आईमाता मंदिर
- नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) – भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक
- वारजे विभाग- वारजे ते एन डी ए रस्ता- ढोणे रस्ता- उत्तमनगर रस्ता.