पुणे : महागाईने आता सर्वत्र हाहाकार माजला असताना पेट्रोल-डिझेल,भाज्या यांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे. पुणे रेल्वे प्लँटफॉर्मची तिकीट दरात तिप्पट वाढ करण्यात आल्यानं आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी पुण्यात रेल्वे स्थानकात जाण्यासाठी अतिरीक्त पैसे मोजावे लागणार आहेत.आधी प्लॅटफॉर्मच्या तिकीटाची किंमत 10 रुपये होती 30 रुपये इतकी झाली आहे.
कारण रेल्वे प्लॅटफॉर्म वरती मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळॆ हा निर्णय घेत असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.तसंच हा तिकीट दरवाढीचा निर्णय 18 मे ते 31 मे या कालावधीपर्यंत लागू असणार आहेच. याचप्रमाणे ज्यांचं तिकीट कन्फर्न झालेलं असेल त्यांनाच रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यात येणार आहे.तसंच ज्यांचतिकीत अजूनही वेटींगवर आहे त्यांना प्रवास करता येणार नाही. याआधी मुंबई रेल्वे प्लॅटफॉर्मवरही तिकीट वाढवण्यात आली होती तर आता पुणे रेल्वे प्लॅटफॉर्मवर वाढवण्यात आली आहे.
पुणे रेल्वे अधिकारी मनोज जव्हार यांनी रेल्वे स्थानक परिसरात येऊन गर्दी करू नये असं आवाहन केलं आहे. सध्या मे महिन्याच्या सुट्टीदरम्यान, अनेकजण रेल्वे स्थानकात आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात येत असतात. यामुळे गर्दी होत असते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे प्रवाशी नाराजी झाले असून या वाढत्या दरवाडीमुळे सर्वात जास्त फटका प्रवाश्याना बसत आहे.