पुणे | शहरातून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत एका २३ वर्षीय तरुणीला घरी बोलवून तिच्या कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अश्लील व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यासोबत लग्न देखील केले. या घटनेने शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कलम 367 अंतर्गत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिमन्यू दिलीप शेरेकर, उदयन दिलीप शेरेकर, दिलीप शेरेकर, प्रशांत कोळी, कपील, सागर यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2022 च्या एप्रिल महिन्यात अभिमन्यूचा मित्र प्रशांत कोळी व वाहनचालक यांनी तिला ठाण्याला नेलं आणि जबरदस्तीने अभिमन्यू याच्याबरोबर लग्न लावलं. पीडित महिलेने फोटो डिलीट करण्याचं सांगितलं असता अभिमन्यूचा भाऊ उदयन शेरेकर आणि वडील दिलीप शेरेकर यांनी तिला मारहाण केली. आई-वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देखील दिली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजगुरू या अधिक तपास करत आहेत.