पुणे | मागील वर्षी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या औंध येथील “ओरा स्पा” सेंटरच्या मॅनेजरला सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. यामध्ये असणाऱ्या सहा पीडित महिलांची त्यावेळी सुटका करण्यात आली होती. तसाच प्रकार पिंपळे सौदागरमध्ये घडलेला उघडकीस आला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने पिंपळे सौदागरमधील येज लाईन टच दी ब्यूटी या स्पा सेंटरवर धापा टाकला. या छाप्यात वेश्या व्यवसाय (Prostitution) करणाऱ्या 5 महिलांची सुटका करण्यात आली. दोन दिवसांपुर्वी पुणे शहरातील कोरेगाव पार्कमध्ये एका स्पा सेंटवर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात दोन एजंटांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी कारवाई आहे.
पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर आहे. या भागात आशियाना पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु होता. या सोसायटीतील फेमिना स्पा मध्ये वेश्याव्यवसायवर 15 फेब्रवारी रोजी पोलिसांनी छापा टाकला. त्यात तीन महिला वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या होत्या. त्यांची सुटका केली. 24, 28 आणि 43 वर्षीय त्या महिला होत्या. या ठिकाणावरुन दोघांना अटक करण्यात आली आहे. नजमूल सुतवली हुसेन (वय 19) आणि रिपुल आलम (वय 19) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिंपळे सौदागरमधील येज लाईन टच दी ब्यूटी या स्पा सेंटरवर धापा टाकला. या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या 5 महिलांची सुटका करण्यात आली. या छाप्यात दोन एजंटांना अटक करण्यात आली होती.