मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, आर्थिक फसवणूक ते बलात्कार… पुण्यातील धक्कादायक घटना

afganistan 4afganistan 4

पुणे | मॅट्रिमोनियल साईटवरुण तरूणाशी झालेली ओळख एका तरुणीला भलतीच महागात पडली. या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर व्यवसायात तोटा झाल्याचे सांगून आरोपीने तरुणीला बँकेकडून कर्ज घेण्यास भाग पाडले. तरुणीची 26 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली.

या प्रकरणी अमित चव्हाण याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे. तरुणीने एका मॅट्रिमोनियल साईटवरुण नोंदणी केली होती. आरोपी चव्हाण याने रोहित राजाराम देशमुख या नावे विवाहनोंदणी संकेतस्थळावर माहिती दिली होती. आयात-निर्यात व्यवसाय असल्याचे त्याने मॅट्रिमोनियल साईटवरील माहितीत नमूद केले होते. तरुणी आणि आरोपी चव्हाण संपर्कात आले. चव्हाणने तिला विवाहाचे आमिष दाखवून भेटायला बोलावले. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि तिची छायाचित्रे काढून बलात्कार केला.

आयात-निर्यात व्यवसायात तोटा झाल्याचे सांगून त्याने तिला कर्ज काढण्यास सांगितले. तरुणीने एका बँकेकडून 26 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज काढून चव्हाणला पैसे दिले. ‘कर्जाचे हप्ते मी भरतो,’ असे त्याने तिला सांगितले होते. चव्हाणने हप्ते न भरल्याने तिने त्याच्याकडे विचारणा केली, तेव्हा समाजमाध्यमात छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Dnyaneshwar:
whatsapp
line