पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून नऊ प्राध्यापक आणि आठ महाविद्यालयांवर कारवाई केली आहे. त्यानुसार प्राध्यापक आणि महाविद्यालयांना दंडही आकारण्यात आला आहे.
परीक्षेच्या कामकाजातील त्रुटी आणि गैरप्रकारांबाबत विद्यापीठाच्या प्रमोद समितीने केलेल्या अहpune university newsवालानुसार विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ही कारवाई केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रश्नसंचातील त्रुटी, निकालातील त्रुटी, गुणदानातील चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे संबंधितांना प्रमोद समितीच्या निर्णयानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले.
इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, नाशिकचे दादासाहेब बिडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नगरचे गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय, दौंडचे सुभाष बाबूराव कुल महाविद्यालय यांना दंड करण्यात आला आहे, तर प्रश्नसंचातील चुकांबाबत प्राध्यापकांना दंड करण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.