पुण्यातील वाढती गुन्हेगारी : अजित पवारांनी घेतली रोखठोक भूमिका

Ajit Pawar has called a party meeting tomorrowAjit Pawar has called a party meeting tomorrow

अजित पवारांनी उद्या बोलावली पक्षाची बैठक

पुणे- सरकार पोलिसांना इतक्या चांगल्या सुविधा देत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण व्हावा. शहराच्या पोलीस प्रमुखाचे हे अपयश आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य करत थेट .. तुम्हाला जमत नसेल तर सांगा .. आमच्याकडे आणखी चांगले अधिकारी आहेत असा थेट पोलीस आयुक्तांना इशारा देत या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांशी संवाद करू असेही म्हटले आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे येथे अधिकाऱ्यांची बैठक घेत पुण्यातील विकासकामांचा आढावा घेतला आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील मुद्यांवर भाष्य केले आहे. याचसोबत त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी देखील काही प्रश्न विचारण्यात आले. यावर देखील त्यांनी उत्तर दिले आहेत.बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहेत. अशात अनेक राजकीय नेत्यांसह समाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “पक्ष वगैरे न बघता दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करणार आहे.”या हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल.

 मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले आहे की, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. ही निर्घून पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही.”बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या हत्याप्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या केंद्रस्थानी सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला होता, असा आरोप केला जात आहे.

अजित पवार यांना विचारण्यात आले की, सुरेश धस यांनी बडी मुन्नी म्हणून काही आरोप केले आहेत. त्यावर बोलताना संतापून अजित पवार हे म्हणाले की, ते त्यांना विचारा…हे असल्या फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावे घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा…कोण आहे ते…सुरेश धस यांच्यावर अजित पवार हे संतापलेले दिसले. राष्ट्रवादीमध्ये एक बडी मुन्नी आहे आणि तिने समोर यावे, असे सुरेश धस यांनी म्हटले होते.

Rashtra Sanchar:
whatsapp
line