दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला, महाराष्ट्राच्या वाट्याला अक्षताच…

पुणे : राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावेत, याकरिता त्या त्या राज्यातील राज्य सरकारकडून प्रयत्न करण गरजेचं असत. स्वाभाविकच असा प्रयत्न सुद्धा महाराष्ट्रात होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाहीत. महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फोक्सकॉन प्रकल्प अचानक गुजरातला गेला. अन महाराष्ट्राच्या वाट्याला वटाण्याच्या अक्षदा मिळाल्या. या प्रकल्पाच्या जाण्याने राज्याची अतोनात हानी झाली आहे.

पुण्यातील तळेगाव दाभाडे औद्योगिक परिसरातील वेदांत फोक्सकॉन कंपनी गुजरातला गेली आहे. त्यामुळे आता पुण्यातील सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. सरकारच्या दिरंगाई कारभारामुळेच कंपनीचे स्तलांतर झाले असून आता पुण्यात सुद्धा या विषयावरून राजकीय आखाडा सुरु झाला आहे.

पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे औद्योगिक परिसरातील वेदांत फोक्सकॉन ही कंपनी गुजरातला नेली आहे. त्यामुळे मावळ तालुकासह पुण्यातील सुमारे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे.भाजपने हा प्रकल्प गुजरातला पळविल्याने मावळातील कामगार चळवळीतील नेत्यांनी आणि राजकीय नेत्यांनी टीका केली आहे. ‘प्रकल्प पुन्हा आणण्यासाठी एकजूट करू, अशी भूमिका भाजपाने तर गुजरातमध्ये कंपनी जाण्यामागे गुजरातधार्जिण्या शिंदे-फडणवीस सरकाचाच हात आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

खरं तर हा प्रकल्प झाला असता तर तालुकासह पुण्याचा सुद्धा बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटला असता. मावळच्या औद्योगिक क्षेत्रात होणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यास शिंदे-फडणवीस सरकारच कारणीभूत आहे. केवळ राजकारणासाठी तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे पाप करू नका. हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्यामागे गुजरातधार्जिण्या शिंदे-फडणवीस सरकारचाच हात आहे. याची मोठी किंमत या सरकारला भविष्यात मोजावी लागणार आहे.
सुनील शेळके, (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)

सध्या उगाच राजकारणाचा बागलबुवा करू नये. त्यामुळे राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा प्रकल्प पुन्हा तालुक्यात कसा येईल, यासाठी प्रयत्न करावा. महाराष्ट्रातील तरूणांना, पुणे व मावळमधील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. या संदर्भात नक्कीच काही तरी मार्ग निघेल अशी आशा आहे.
– बाळा भेगडे, (माजी मंत्री व भाजपचे नेते )

राज्यात खूपच बेरोजगारी वाढली आहे. सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या उपलब्ध नाही. मुळात असा प्रकल्प कंपनी केवळ गुजरातलाच का जाते. याचा सुद्धा विचार करावा. आता राजकारण करण्यापेक्षा सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न कसे मार्गी लागतील, याचा सरकारने विचार करावा.
– अजय शिंदे , (पुणेकर)

Dnyaneshwar: