कोहिनूर दिल्ली दरबार बिर्याणीची मेजवानी

बिर्याणी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. खवय्यांना बिर्याणी खायची चव सुटली, की त्यांना बिर्याणीचा आस्वाद घेतल्याशिवाय काही राहावत नाही. मग लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला चमचमीत, स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घ्यायला आवडतंच. त्यासाठी खवय्ये कितीही लांबचा प्रवास करायला तयार असतातच.

सोबतच नॅानव्हेज म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतंच. मग त्यामध्ये चिकन, मटण असो किंवा मच्छी असो या पदार्थांचं नाव जरी ऐकलं तरी नॅानव्हेजप्रेमींना या पदार्थांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहावत नाही. तर असेच नॅानव्हेजप्रेमी एखाद्या प्रसिद्ध हॅाटेलच्या शोधात असतात. तर अशाच नॅानव्हेजप्रेमींसाठी कोहिनूर दिल्ली दरबार प्रसिद्ध आहे. कोहिनूर दिल्ली दरबार हे हॅाटेल संतोष वांडेकर यांचं आहे. तसेच या हॅाटेलने खवय्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

कोहिनूर दिल्ली दरबार हे हॅाटेल गणपती मंदिराजवळ, मानाजीनगर, नर्‍हे, पुणे येथे आहे. कोहिनूर दिल्ली दरबार या हॅाटेलची चिकन बिर्याणी, रायता, चिकन कबाब, चिकन ६५, चिकन लॅालिपॅाप, चिकन चिली, चिकन ड्राय, चिकन तंदुरी, चिकन दम बिर्याणी, चिकन मन्चुरिअन, चिकन सिख कबाब, चिकन अफगानी लेग, चिकन अंगारा लेग, चिकन मलाई कबाब, चिकन रेशमी कबाब, चिकन प्लेटर असे अनेक चवीष्ट पदार्थ त्यांची खासियत आहेत. तसेच या हॅाटेलने त्यांच्या पदार्थांची चव कायम ठेवल्याने या हॅाटेलला खवय्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

विशेष म्हणजे कोहिनूर दिल्ली दरबारमध्ये बसण्यासाठी स्वच्छ जागा, प्रसन्न वातावरण आणि पदार्थांची चव यामुळे या हॅाटेलकडे खवय्यी नेहमी आकर्षित होतात. तसेच अत्यंत शुद्ध आणि दर्जेदार मसाले, कायम ताजे आणि शुद्ध नॉनव्हेज, भाज्या वापरून बनवलेले पदार्थ खाऊन तेथे जाणारे सर्व खवय्ये आनंदी आणि तृप्त होतात. सोबतच बाहेरून पुण्याला भेट देणार्‍या हौशी खवय्यांनासुद्धा कोहिनूर दिल्ली दरबार या हॅाटेलने भुरळ घातली आहे.

या हॅाटेलमध्ये मिळणारे सर्व पदार्थ सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच खिशाला परवडणारे आहेत. सोबतच कोहिनूर दिल्ली दरबारचे आदरातिथ्य खवय्यांना पुन्हा पुन्हा तेथे येण्यास भाग पाडते. तर तुम्हाला स्वादिष्ट नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा सुटीचा दिवस असो किंवा इतर वेळी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, परिवारासोबत टाईम स्पेंड करायचा असेल, पार्टी करायची असेल तर आवर्जून कोहिनूर दिल्ली दरबार या हॅाटेलला भेट द्या.

Dnyaneshwar: