पुण्याच्या सिद्धार्थला ‘सिल्व्हर बीव्हर अॅवॉर्ड’

पुणे : पुण्यातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निकमधील मेकॅनिकल शाखेचा विद्यार्थी आणि युवा दिग्दर्शक सिद्धार्थ बाळकृष्ण दामले याच्या ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या माहितीपटाला अकराव्या इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिल्व्हर बीव्हर अॅवॉर्ड मिळाले आहे. हा फेस्टिव्हल भोपाळ शहरात पार पडला. सिद्धार्थ बाळकृष्ण दामले याने पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे. प्रत्येक क्षेत्रात पुण्यातील विद्यार्थ्यांनी नाव कमावले आहे. यात आता सिद्धार्थ बाळकृष्ण दामले याच्या नावाचा समावेश झाला आहे.

महितीपट नक्की कशावर आधारित आहे?
परसबागेतील बुलबुल पक्ष्याच्या जोडीकडून घरट्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद केली आहे. अनेक दिवस ही प्रक्रिया कॅमेऱ्यात कैद करत होता. एक दिवस अचानक त्यावर बहिरी ससाण्याचा हल्ला, उरलेल्या अंड्यातून होणारे प्रजनन, पुढे जाणारे जीवन हे सगळे कॅमेऱ्यात कैद केली आहे. बहिरी ससाण्याचा हल्ला हा दुर्मिळ मानला जाणारा शॉट कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्याच्या माहितीपटाची इंडिया नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड झाली आहे. रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरचे सदस्य डॉ. बाळकृष्ण दामले यांची निर्मिती आहे. मोहिनी दामले, मिलिंद पाटील यांनी संशोधन केले.

Dnyaneshwar: