पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं दुसऱ्यांदा ‘शुभमंगल सावधान’; 6 वर्षाआधी पहिला घटस्फोट!

मुंबई – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहेत. 2016 साली भगवंत मान यांचा घटस्फोट झाला होता. हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. या विवाहसोहळ्याला मोजकीच लोक उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत.

पत्नी इंद्रप्रीत कौर यांनी भगवंत मान यांच्यापासून फारकत घेतली. कोर्टानं निर्णय दिलाय, मला दोन परिवारांमधून एका परिवाराची निवड करायची होती, मी पंजाबला निवडलं असल्याचं भगवंत मान म्हणाले. भगवंत मान यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर या आपल्या मुलांसह अमेरिकेत गेल्या होत्या त्या तिथेच राहू लागल्या.

दरम्यान, भगवंत मान यांच्या आई आणि बहिणीनं त्यांच्यासाठी मुलगी पसंत केली. त्यानंतर मान गुरप्रीत यांना भेटले. त्यांना लग्नास होकार दिला. साध्या पद्धतीनं त्यांचा विवाह होईल. गुरप्रीत कौर भगवंत मान यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत. 

RashtraSanchar: