अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढल्या!

हैद्राबाद  : संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘पुष्पा 2 : द रुल’ (Pushpa 2 : The Rule) फेम अल्लू अर्जुन (Allu Arjun) आज मंगळवारी (दि.२४) हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिस स्थानकात हजर झाला. अल्‍लू अर्जुनला पोलिसांनी संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावले होते. पोलिसांनी त्याला आज सकाळी ११ वाजता हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार तो दिलेल्या वेळेत चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात हजर झाला.रविवारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी अर्जुनच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गेल्या रविवारी उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थी असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांच्या एका गटाने अल्लू अर्जुनच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली होती. अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या ज्युबली हिल्स येथील घरात घुसून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांना अटक केली होती. त्यांना सोमवरी हैदराबादच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Rashtra Sanchar Digital: