पीव्ही सिंधुची बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधुनं बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत पीव्ही सिंधुनं चीनच्या हि बिंग जियाओला पराभूत केलं आहे. हि बिंग जियाओ विरुद्ध पीव्ही सिंधुनं  21-9, 13-21, 21-19 असा विजय मिळवला आहे.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूनं शानदार सुरुवात केली आहे. सिंधू पहिल्या सेटमध्ये बिंग जियाओवर पूर्णपणे भारी पडली. अखेर 21-9 च्या फरकानं पीव्ही सिंधुनं पहिला सेट जिंकला. सिंधुच्या आक्रमक खेळीसमोर बिंग जियाओनं गुघडे टेकले. परंतु, तिसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान, बिंग जियाओनं 21-13 फरकानं दुसरा सेट जिंकत  शानदार पुनरागमन केलं आहे.

तिसऱ्या आणि अखेरच्या सेटमध्ये पीवी सिंधुनं बिंगजियाओला एकही संधी दिली नाही. 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर सिंधूनं 6-2 अशी आघाडी घेतली. पण बिंग जियाओ पुनारागमन करत पीव्ही सिंधुला जोरदार टक्कर दिली. अखेरीस, सिंधुनं तिसरा सेट 21-19 फरकानं जिंकून उपांत्य फेरीत धडक दिली आहे. 

 

Sumitra nalawade: