शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अभिनंदन
राजगुरुनगर : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. दिलीप मुळूक यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी. पदवी जाहीर केली. या यशाबद्दल मुळूक यांचे खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष डॉ. देवेंद्र बुट्टे-पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक शांताराम घुमटकर, डॉ. रोहिणी राक्षे, हिरामण सातकर, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. प्रा. दिलीप मुळक यांनी ‘न असेसमेंट ऑफ डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक अॅन्ड इम्पॅक्ट ऑफ पॉप्युलेशन प्रेशर ऑन लॅन्ड रिसोर्सेस इन पुणे डिस्ट्रिक्ट’ (महाराष्ट्र) या विषयावर पीएच. डी. पदवीसाठी संशोधन केले. पुण्यातील टी. जे. महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. दिलीप मुळूक यांनी पुणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या गुणवैशिष्ठ्यांचा अभ्यास आणि लोकसंख्येचा भूमी संसाधनांवरील दबावाचे मूल्यांकन या विषयावर सविस्तर संशोधन केल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. देवेंद्र बुट्टे-पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.