“बाहेरून किर्तन अन् आतून तमाशा…”, राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर सडकून टीका

अहमदनगर | Radhakrishna Vikhe Patil – राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. “विरोधकांच्या मोट बांधणीला काही अर्थ नसून ते फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत. जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उंचावत चालली आहे त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. त्यांना आपलं दुकान बंद होण्याची भीती वाटत आहे त्यामुळे ते सगळे एकत्र येत आहेत”, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

“तसंच अरविंद केजरीवाल यांनी शरद पवारांविषयी काय उद्गार काढले किंवा उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांविषयी काय उद्गार काढले आहेत ते जरा तपासा. त्यामुळे विरोधकांचं बाहेरून कीर्तन अन् आतून तमाशा चालला आहे”, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली.

पुढे राधाकृष्ण विखे पाटलांनी जागावाटपावरुन शिंदे गट आणि भाजप यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचं सांगितलं. “आमच्यात कसल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. पण जरी जागा वाटपाबाबत एखाद्या पक्षाचा नेता बोलत असेल तर त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे”, असंही ते म्हणाले.

Sumitra nalawade: