मुंबई | Radhika Apte Made A Shocking Revelation About Her Marriage – अभिनेत्री राधिका आपटे ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. विशेष म्हणजे राधिका आपटेनं तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच राधिका तिच्या भूमिकांमुळे नेहमी चर्चेत असतेच. पण त्याचबरोबरीने राधिकाचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. काही वर्षांपूर्वी राधिकाने लंडनमध्ये स्थायिक असलेला संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये राधिकाचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. दरम्यान, राधिकानं तिच्या लग्नातला एक धक्कादायक खुलासा केला आहे.
राधिकानं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या लग्नाबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी ती म्हणाली, “10 वर्षांपूर्वी बेनेडिक्ट आणि माझं लग्न झालं. पण लग्नामध्ये आम्ही फोटो काढायलाच विसरलो. आम्ही आमच्या जवळच्या मित्र-मंडळींना लग्नासाठी आमंत्रित केलं. स्वतःचं जेवण बनवलं. इंग्लंडमधील एका ठिकाणी आम्ही लग्न केलं. तिथेच पार्टी केली. इतकं सगळं झालं पण आम्ही फोटो काही काढले नाही. आमचे काही मित्र तर उत्तम छायाचित्रकार होते. तरीही त्यांनी आमचे फोटो काढले नाहीत.”
“आम्ही फोटो काढले नाहीत कारण माझ्या नवऱ्यासह आम्ही सगळेच तेव्हा नशेमध्ये होतो. म्हणून माझ्या लग्नाचा एकही फोटो माझ्याकडे नाही. पण हे एका अर्थी चांगलं देखील आहे. माझ्या नवऱ्याला खरं तर फोटो काढण्यामध्ये रसच नाही. आता त्याच्यामध्ये थोडीफार सुधारणा झाली आहे. आम्ही फिरायला जातो तेव्हा फोटोसाठी तो पोझ देतो,” असं राधिकानं सांगितलं आहे.